– पोलीस स्टेशन रामटेक यांची कारवाई
पो.स्टे. रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथील पोलीस स्टाफ यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील हॉटेल (बाबा) रसोई येथे एक इसम नामे १) अश्विन नरेंद्र उके, वय २८ वर्ष, रा. जांब ता. मोहाडी जि. भंडारा हमु योगीराज हास्पीटल जवळ रामटेक (हॉटेल चालक) हा इसम स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता मुलींना पैश्याचे आमीष देवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त करून हॉटेल (बाबा) रसोई मध्ये रूम उपलब्ध करून त्याचे कडुन देहव्यवसाय करून घेत आहेत. अशी मुखबिराचे खात्रीशिर माहीती मिळाल्यावरून सदरची माहिती ही पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांना देवून त्यांचे आदेशाने बोगस पंटर पंचनामा कारवाई करून बोगस ग्राहक पाठवुन व त्याच्या इशाऱ्याप्रमाणे पोलीस स्टाफसह रामटेक ते खिंडसी तलाव रोडवरील स्थित हॉटेल (ढाबा) रसोई जवळील हायवे रोडजवळ रेड कारवाई करून २) सचिन ईश्वर वैद्य वय ३१ वर्ष रा. शिवणी मोडकी ता. रामटेक (हॉटेल मॅनेजर) दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे- महिला सहायक पोलीस निरीक्षक स्वाती साबले पोलीस स्टेशन रामटेक यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीतांविरुध्द कलम ३ ४ ५ ७ अनैतीक व्यापार प्रतीबंध अधिनियम १९५९ कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यादव हे करीत आहे. सदरची कारवाई ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक आशित कांबळे, पोलीस निरीक्षक एच. एस. यादव, महिला सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यावले, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लाजेवार, पोलीस नायक प्रफुल रंघई, अमोल इंगोले, महिला पोलीस नायक जोत्सना मसराम, पोलीस शिपाई शरद गिते, धिरज खते, विशाल चव्हान, संतोष हटवार यांनी पार पाडली.