नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत अवस्थि नगर चौक येथुन एका संशयीत दुचाकीवर दोन ईसम फिरतांना दिसल्याने त्यांना थांबवुन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे नाव १) बुध्दजीत अरूण गजभिये वय २८ वर्ष, रा. करसा, ता. मौदा, जि. नागपूर, ह.मु. म्हाडा क्वॉर्टर, गोधनी, नागपूर २) भानुप्रतापसिंग दिवानसिंग ठाकुर, वय २१ वर्षे, रा. ह.मु आवडे नगर, कपिलनगर, नागपूर असे सांगीतले. आरोपींना वाहनाबाबत विचारपूस केली असता, त्यांनी नमुद वाहन जि. शिवनी (मध्य प्रदेश), पोलीस ठाणे कोतवाली हदीतुन चोरी केल्याचे सांगीतले. त्यानुसार पोलीस ठाणे कोतवाली येथे संपर्क करून शहानिशा केली असता, तेथे वाहन वाहन क. एम.पी २२ एम.ई ८०९८ हया दुचाकी बाबत कलम ३०३(२) भाल्या.सं. अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. दोन्हीही आरोपींना अटक करून मुद्देमालासह पोलीस ठाणे कोतवाली, जि. शिवनी मध्य प्रदेश पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.