– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- फिर्यादी शुभम खोजेंद्र वालदे, वय २९ वर्ष, रा. साई मंदिर जवळ पिवळी नदी कामठी रोड नागपूर हा फिरा हॉटेलमध्ये मॅनेजर असून हॉटेल मधील काम करणारा मुलगा कृणाल चव्हाण याने फिर्यादीला फोन करून सांगितले की हॉटेलमधील किचन रूम मधील किराणा सामान, डेरीचे सामान, कॉम्प्युटर व कॅश चोरी गेलेले आहे. यावरून फिर्यादीने हॉटेलमध्ये येऊन पाहणी केली असता चोराने किचनच्या खिडकी मधून आत प्रवेश करून किचन मधील किराणा सामान डेरीचे सामान व कॉम्प्युटर कॅश काऊंटर मधील नगदी ५,०००/- रुपये असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले. अशा फिर्यादीच्या रोपोर्ट वरून पो.स्टे. खापरखेडा येथे अप. क्र. ३९६ / २३ कलम ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपासात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने दिनांक ०७/०७/२०२३ रोजी कन्हान उपविभागातील पोलीस स्टेशन खापरखेडा येथील अप. क्र. ३९६/२३ कलम ४५७, ३८० भा.द.बी. चे गुन्हयात समांतर तपास करीत असता मुखबिरकडुन गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे जरीपटका नागपूर हद्दीत संशयीतरीत्या फिरत आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने जरीपटका नागपूर हद्दीत सापळा रचून आरोपी नामे १) रोहित गणेश गुप्ता, वय २९ वर्ष, रा. जरीपटका नागपूर २) मनीष राजबहाद्दूर कुशवाह, वय २९ वर्ष, रा. जयताळा नागपूर यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता दोघांनी सदर गुन्हा केल्याचे कबुली दिली. यातील दोन्ही आरोपीस ताब्यात घेवुन त्यांचे कडुन गुन्हयातील १) किराणा सामान किमती अंदाजे २००००/- रु. २) कॉम्प्युटर cpu किंमती अंदाजे १५०००/-रु.३) नगदी ५०००/- रु. ४) गुन्हयात वापरलेला मोटरसायकल हिरो मोपेड क्र. MH १ FD ८१६७ किंमती अंदाजे ६००००/- रु. असा एकूण १,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील योग्य कायदेशीर कारवाईस्तव पोलीस स्टेशन खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अनील राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, ईकबाल शेख, पोलीस नायक विरेंद्र नरड, पोलीस शिपाई अभिषेक देशमुख वाहन चालक मोनू शुक्ला यांनी पार पाडली.