नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार ता.28) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रिचफिल त्रिकोलॉजी सेंटर हेयर ॲन्ड स्कॅल्प क्लिनीक, लोकमत चौक, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर क्लिनीकचा सामान्य कचऱ्या मोकळया जागेवर पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. निर्मल इंग्लिश मिडीयम स्कुल, अनमोल नगर, वाठोडा, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर परवानगीशिवाय अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला.सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. कुशाल सोनपापडी, मारवाडी चौक, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. बालाजी ट्रान्सपोर्ट, स्मॉल फॅक्टरी ऐरीया, नागपूर यांच्यावर कार्यालयाचा कचरा रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत टाकलाबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.