एम.डी पावडर बाळगणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, अमीत पान सेंटर समोर कुंभार टोळी, नागपूर येथे एका मोटर सायकल वरील दोन इसमांवर संशय आल्याने त्यांना थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यानी त्यांचे नावे आरोपी क. ०१) मुकेश उर्फ नन्हे विवेक सनकाळे वय ३४ वर्ष रा. जुना बगडगंज कुंभार टोळी नंदनवन, २) अक्षय गजानन येवले वय २९ वर्ष, रा. गणपती नगर गुमधाळा कॉलनी मौदा जि. नागपुर, असे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळ ११.८३ ग्रॅम एम.डी. पावडर किंमती १.१८.३००/ रू ची मिळुन आली. आरोपीचे ताब्यातुन एम.डी पावडर, दोन मोबाईल फोन, एक मोटर सायकल असा एकुण १,६६,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपोंचे हे कृत्य कलम ८ (क), २२(ब) २९ एन.डी.पी. एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलीस ठाणे नंदनवन येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाई कामी नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा, पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि, गजानन गुल्हाने, सपोनि मनोज घुरडे, सफौ. सिध्दार्थ पाटील, पोहवा. सुरज भानावत, मनोज नेवारे, नितीन सांळुखे, पोअं. रोहीत काळे, सुभाष गजभिये, यांनी केली.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस

Thu May 23 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे पारडी ह‌द्दीत दुर्गा नगर प्लॉट क. १४४ पारडी नागपुर, येथे राहणारे फिर्यादी सुरेश प्रमोद कुरमनकर वय २३ वर्ष यांनी त्यांची होन्डा शाईन गाडी क. एम. एच ४० एस. आर. ७६६९ काळया रंगाची किंमत्ती १०,०००/- रू ची पारडी मेडप्लस ऑफीस चे समोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीची होन्डा शाईन गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com