कळमेश्वर :- पोस्टे कळमेश्वर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील मौजा सावंगी गावात डोंगरे ले आउट येथील खाली प्लॉट मध्ये काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे कळमेश्वर येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी मौजा सावंगी गावात डोंगरे ले आउट येथे सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे १) संदीप चैतराम कोपोले, वय ३१ वर्ष रा सावंगी कळमेश्वर, २) नवशाद रशीद शेख वय ३५ वर्ष रा. उपरवाही, ३) अश्विन श्रीराम गौतम, वय ३० वर्ष रा, सावंगी ता. कळमेश्वर, ४) फिरोज इब्बु शेख वय ३७ वर्ष रा. उपरवाही ता. कळमेश्वर, ५) नितीन परसराम राउत वय ३७ वर्ष रा. सावंगी, ६) खुशाल किसनाजी मस्के वय ३३ वर्ष रा. सावंगी ता कळमेश्वर, ७) बंसल राजेश डेहरिया वय २४ वर्ष रा. सावंगी ता कळमेश्वर, ८) अविनाश श्रीराम गौतम वय २८ वर्ष रा. सावंगी कळमेश्वर, ९) ग्यानदेव नामदेव दिगेकर वय ४५ वर्ष रा. सावंगी ता. कळमेश्वर हे जुगार खेळतांनी मिळुन आले. एकुण ०९ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन डावावर असलेले ५२ ताश पत्ते, नगदी ९,५००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे कळमेश्वर येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार पोनि मनोज काळबांडे, पोउपनि मनोज टिपले, दत्तात्रय कोलते, पोना दिनेश गाडगे, पोअं. हितेंद्र चौधरी यांनी पार पाडली.