संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी नगर परिषद निवडणुकीचे गणित बदलणार!
– ओबीसी आरक्षणामुळे निघणार नव्याने सोडत
कामठी ता प्र 23 :- आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणा विनाच होणार असल्याचे गृहीत धरून तसे आरक्षण सोडतिचा कार्यक्रम आटोपुन झाला असून निवडणुका लागण्याच्या तोंडावर असतानाच आता 20 जुलै ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षण लागू झाल्याने आता कामठी नगर परिषद ची आरक्षण सोडत ही नव्याने 28 जुलै ला होणार असून नव्याने होणाऱ्या आरक्षणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे परिणामी कामठी नगर परिषद च्या निवडणुकीचे गणित आता बदलणार आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या कामाला सुरुवात झाली होती त्यात प्रभाग रचनेचा टप्पा पार पडला, ओबीसी आरक्षणाचा विषय नसल्याने आरक्षण सोडतही जाहीर झाली होती व त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सोडून सर्वच जागा खुल्या गटातून लढत देणार होत्या परिणामी आजी-माजीच काय नवनवे चेहरे इच्छुकाच्या गर्दीत दिसून येत होते.
खुल्या गटातुन कुणीही लढू शकणार असल्याने त्यांचे सेटिंगसुद्धा सुरू होते मात्र असे होत असतानाच ओबीसी आरक्षणाचा विषय सुटला व त्यामुळे आता ओबोसी आरक्षण लागू झाल्याने आता नव्याने आरक्षण सोडत निघणार आहे .अशातच आता सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतोकडे लागले आहे.