नागपूर :- पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत पेट्रोलींग दरम्यान गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन प्लॉट नं. ६६१, बाबा दिपसिंग नगर, गुरुद्वारा जवळ, नारी रोड, कपिलनगर, नागपूर येथे राहणारा आरोपी क. १) परविंदरसिंग प्रितमसिंग घट्टोरोडे, वय २३ वर्षे हा स्वतःचे घरी अवैधरित्या विनापरवाना जुनी वापरती एक सिल्व्हर रंगाची लोखंडी गावठी पिस्टल, मॅगझीन असणारी जिच्या मुठीवर काळया रंगाची ग्रीप असलेली ग्रोवर दोन्ही बाजूस माश्याचे चित्र कोरलेली, किमती अंदाजे ५०,०००/- रु. ची बाळगतांना मिळून आला. त्यास ताब्यात घेवून अधिक विचारपुस केली असता, त्याने सदरची पिस्टल ही आरोपी क्र. २) मॉरीस एरीकस्वामी फांसीस वय २० वर्ष, रा. मोहन नगर, खलासीलाईन सदर, नागपूर याचेकडुन विकत घेतल्याचे सांगीतले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेविरुद पोलीस ठाणे कपिलनगर येथे कलम ३/२५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो. का. अन्वये गुन्हा नोदवुन आरोपींना अग्नीशत्रसह मुद्देमाल कपिलनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कामगिरी मुम्मका सुदर्शन, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. राहुल शिरे, सपोनि गणेश पवार पोहवा राजेश तिवारी, संतोषसिंग ठाकुर, नापोअ गजानन कुबडे, प्रविण शेळके, महेंद्र सडमाके, अर्जुन यादव, शैलेष जांभुळकर, सुनिल कुवर, आशीष वानखेडे पोज संदीप पांडे, आशिष चंदरे, सचिन चढिये, दिनेश डवरे, विवेक श्रीपाद यांनी केली.