नागपूर :- फिर्यादी उत्तम अरूनलाल चौधरी हा गोडावुन मध्ये काम असल्यामुळे गोडावुनचा मागे गेला असता गोडावुन चेक केले असता गोडावुन मधील १) पॉवरकेबल २) चोप्सों मशिन ३) पुरानी पाँवर कटिंग मशिन ४) पॉवर टुल्स स्पेअर ५) पुराना कॉपर केबलग्लैंड ६) पुरानी इजिलेजर मशिन ७) पुराने मास्टर लेबल ८) डीव्हीआर असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोस्टे मौदा येथे अप क्र. २९३/२४ कलम ४५७, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभाग परीसरात आरोपी शोधकामी पेट्रोलींग तसेब पो.स्टे. मौदा अप. क्र. २९३/२४ कलम ४५७, ३८० भा.द.वि. गुन्हयाचे समांतर तपास करीत असता गुप्त माहीतगारां कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, पारडी येथे राहणारा राजेश शाहू याने आपले सहकाऱ्या सोबत मिळून शर्मा फेब्रीकेटर्स अॅन्ड इलेक्ट्स प्रा. लिमी. गुमथळा येथे चोरी केली आहे. अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने स्टाफ यांनी राजेश शाहू यास त्याचे घरी जावुन ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव राजेश सत्यजीत शाहू वय ३१ वर्ष रा. तलमले लेआऊट भरतवाडा रोड कळमना नागपूर असे सांगीतले त्यास विश्वासात घेवुन विचारपूस केली असता त्याने दिनांक १२/०३/२०२४ ते १३/०३/२०२४ चे रात्री दरम्यान गुमथळा येथील कंपनीत आपले साथीदार नामे १) सुरज प्रभुनाथ तिवारी वय २२ वर्ष रा. न्यु. ओमनगर तलमले लेआऊट भरतवाडा रोड कळमना नागपूर २) राहूल धमरपाल मेश्राम वय २५ वर्ष रा. न्यु. ओमनगर तलमले लेआऊट भरतवाडा रोड कळमना नागपूर ३) अभिजीत मनोहरसिंग चौव्हाण वय ३२ वर्ष रा. नवकन्या नगर शितलामाता मंदीर सोहेल खान यांचे घरी किरायाने कळमना नागपूर यांचे सोबत मिळून कंपनीत चोरी करून चोरीचा मुद्देमाल अभिजीत चौव्हाण याचे मालवाहू अपे गाडीत आणून सदर चोरीचा मुद्देमाल संतोश बंसा शाहू, वय ३२ वर्ष, रा. बिनाकी मंगळवारी पास विकल्याचे सांगीतले. आरोपीतांनी राजेश शाहू याचे सोबत मिळून गुमथळा येथील कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीतांच्या ताब्यातून १) १५१ किलो नट बोल्ट किमती ६००००/- रु. २) वेल्डींग मशिन किमती १०,०००/- रु ३) कटर मशिन किंमती १०,०००/- रु ४) जळालेला कॉपर वायर ४० किलो किंमती २४०००/-रू जळालेला अॅल्युमिनीयम ५० किलो. किमती ६,०००/- रू ६) गुन्हयात वापरलेली लाल रंगाचा तिन चाकी अपे मालवाहू कंमाक एमएच-४९-बीएम-४७४१ किंमती १,००,०००/-रू असा एकूण किंमती २,१०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोउपनि बट्टूलाल पांडे, सफौ. ज्ञानेश्वर राऊत, पोहवा विनोद काळे, ईकबाल शेख, प्रमोद भोयर, पोना संजय बरोदीया, पोशि अभिषेक देशमुख, पोशि निलेश इंगुलकर, चापोहवा मुकेश शुक्ला यांनी पार पाडली.