बकरी चोरीचे गुन्हयातील आरोपी नागपूर ग्रामीण पोलीसांच्या जाळयात

सावनेर :- दि. २६/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात प्रोव्हीशन तसेच जुगार रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना सावनेर ते केळवद रोड वरील सावनेर ते पांडुर्णा उडानपुलचे खाली एक जुनी वापरती निळ्या रंगाची वर्णा चार चाकी कार क्र. एम.एच ०२ ए. वाय ००४३ हि संशयीतरित्या दिसुन आली त्या गाडीला स्टाफचे मदतीने मेराव टाकुन वर्णा कार चालकास ताब्यात घेउन त्याचे नाव, गाव विचारले असता त्यांनी आपले नाव सोहेल महेबुब शाह, वय २१ वर्ष, रा. वार्ड क्र. १४ चिचपुरा सावनेर ता. सावनेर ह. मु. फातमा मस्जित जवळ, पीली नदी. यशोधर नगर नागपुर असे सांगीतले. त्याचे ताब्यात असलेली निळ्या रंगाने होन्डाई वर्णा कार क्र. एम.एच ०२ ए.वाय. ००४३ ची पाहणी केली असता गाडीचे मागचे सिट वर तसेच डिक्कीमध्ये बकरीचे केस तसेच बकरीच्या लेंड्या दिसुन आल्या. ताब्यात घेतलेला इसम नामै सोहेल शाह यास विश्वासात घेउन विचारपुस कैली असता त्याने फरार आरोपी नामै तोहसीफ रा. मोमीनपुरा, नागपुर याला सोबत घेउन खालील प्रमाणे गुन्हा कैल्याचे कबुल केले.

पो. स्टे केळवद येथील १) अप. कं. १०७/२४० कलम ३७९ IPC

२) अप, कं. १२५/२४ कलम ३७९ IPC पो स्टे खापा

३) अप के २४/२४ कलम ३५७, ४८० IP(

तसेच चोरी केलेला मुद्देमाल हा युसुफ रा. कलमना नागपूर यास विक्री केल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यातून १) नगदी १७,०००/- रू २) २ अँड्रॉइड मोवाईल १०,०००/-रू. ३) जुनी वापरती होंडाई वर्णा कार क्रे, कार क्र. एम.एच ०२ ए.वाय. ००४३ किंमती २,००,०००/-रु. असा एकूण २,२७,०००/- रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त मुद्देमाल व आरोपीस वैदयकिय तपासणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे केळवद यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रगीण हर्ष ए. पोहार (गापोरी), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनी किशोर शेलकी, पोहवा राजू रेवतकर, रोशन काळे, विरेंद्र नरड, विपीन गायधने, शंकर मडावी, उमेश फुलवेल, पो. हवा किशोर वानखेडे, आशिष मुंगळे स्था गु शा ना. ग्रा यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एलएंडटी लॉजिस्टिक्स पार्क में भीषण आग

Thu Mar 28 , 2024
नागपुर :- दोपहर में अमरावती रोड पर 14 माइल पर एलएंडटी लॉजिस्टिक्स पार्क। करीब 12 बजे भीषण आग लग गयी. घटना की सूचना अग्निशमन विभाग को मिलते ही सिविल लाइन फायर स्टेशन 3, कलमेश्वर, वाडी और मिहान से एक- एक दमकल गाड़ी मौके पर पहुंची. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com