नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. १६, ओम साई नगर, मानेवाडा बेसा येथे राहणाऱ्या फिर्यादी यांचे सासरे माणिकराव पुंडलीक इंगळे वय ६९ वर्ष हे सि.आर.पी.एफ मधुन निवृत्त असुन त्यांचे कडे परवाना असलेली १२ एम. एम बोअर रायफल आहे, व ते सिस्को कंपनीमध्ये ए.टी.एम कॅश गाडीवर सुरक्षा रक्षकचे काम करतात. फिर्यादीचे पती नितीन माणिकराव इंगळे वय ४० वर्ष हे काम धंदा करीत नसल्याने फिर्यादीचे सासरे त्यांचे पतीचा राग करतात. याच कारणावरून दिनांक ०८.०७.२०२४ चे २२.३० वा. चे सुमारास, त्यांचे मध्ये वाद-विवाद होवुन भांडण झाले असता, फिर्यादीचे सासरे आरोपी यांनी त्यांची रायफल घेवुन त्यामध्ये गोळी भरून फिर्यादीचे पत्तीचे अंगावर जिवे मारण्याचे उद्देश्याने तानली. फिर्यादी व त्यांची सासु व दिर यांनी आरोपीचे हातातील रायफल घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीचे पतीचे पायावर गोळी झाडुन गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार मेडीकल हॉस्पीटल येथे सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी विणा नितीन राऊत/इंगळे वय ३५ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे सपोनि, डंगोले यांनी आरोपीविरूध्द कलम १०९ भा.न्या.संहीता सहकलम ३/२५ भा.ह.का अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.