घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, ०३ गुन्हे उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत गुरूनानक सोसायटी, भारत कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. १०१, जरीपटका, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे नकुल रामकिशनमल बजाज वय ५२ वर्षे, यांच्या तिन्ही मुली पहाटे घराला बाहेरून लॉक लावून सत्संग कार्यक्रमाकरीता जरीपटका मार्केट येथे गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे फ्लॅटने दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख २०,०००/- रू. व सोन्याचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे ७,१०,०००/- रू. या मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपासावरून तसेच मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नंदुरबार पोलीसांचे मदतीने आरोपी क. १) जोगोंदरसिंग बचपनसिंग शिकलीकर वय ३२ वर्ष २) ईमरान दिलावर शेख वय १९ वर्ष दोन्ही रा. सोरापाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार ३) निशानसिंग जतनसिंग शिकलीकर (बरनाला) वय ३१ वर्ष रा. एकता नगर, नंदुरबार, ह.मु. वि.आर.सी गेट, उधना, सुरत, गुजरात यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना अधिक विचारपूस केली असता, त्यांनी यागुन्हया व्यतीरिक्त पोलीस ठाणे अजनी हद्दीत घरफोडी, तसेच नागपुर रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातून रोखा ३८,५००/- रू., सोन्याचे दागिने, सिक्के, नेकलेस, घडयाळी असा एकुण किंमती अंदाजे ११,१४,९८०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना मुद्देमालसह पुढील कारवाई करीता जरीपटका पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कामगिरी . रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर,  संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर,  राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि, मयुर चौरसिया, पोहवा. राजेश देशमुख, प्रशांत गभणे, श्रीकांत उईके, हंसराज ठाकुर, सुभिर पवार, नापोअं. प्रविण रोडे, पोअं, आशिष वानखेडे व निलेश श्रीपात्रे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दखल

Thu Oct 10 , 2024
नागपूर :– पोलीस ठाणे अजनी हद्दीत चंद्रमणी नगर, प्लॉट नं. ३, बुध्द विहार जवळ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सचिन रतन सातपूते, वय ४२ वर्ष, यांचे शेजारी राहणारे यांचे मार्फतीने त्यांची ओळख आरोपी नामे चंद्रशेखर गुणवंतराव हिवरे वय ४५ वर्ग, रा. प्लॉट नं. ८०, ब्रम्हा नगर, नरसाळा, नागपूर यांचे सोबत झाली. दिनांक २४.०६. २०२४ चे १७.३० वा. व पुर्वी आरोपीने फिर्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com