युवा चेतना मंच तर्फे रनाळा येथे मराठी राजभाषा दिन साजरा .

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 27 – मराठीतील थोर साहित्यीक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात” मराठी राज्यभाषा दिन “म्हणून साजरा करण्यात येतो.युवा चेतना मंच तर्फे रनाळा येथील स्वामी विवेकानंद वाचनालय येथे “मराठी राजभाषा दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी रनाळा ग्रामपंचायत सरपंच पंकज साबळे , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे ,दिव्यांग बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष बाँबी महेंद्र व जेष्ठ नागरिक रामचंद्र जी नागपुरे , विष्णु जी कुकडे , मारूती जी ईरबत्ती , सुरेश पोलनवार प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले. आपणा सर्वांना मराठी भाषेविषयी अस्मिता असली पाहिजे व ती सर्व मराठी भाषिकांनी जाणीवपूर्वक जपली पाहिजे असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खोपे तर प्रास्ताविक प्रा. पराग सपाटे व आभार प्रदर्शन अमोल नागपुरे यांनी केले . याप्रसंगी मराठी भाषेतील पुस्तकांची छोटेखानी अशी प्रदर्शनी लावण्यात आली व मराठी तील प्रमुख पुस्तकांची माहितीदेखील याप्रसंगी देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता दिव्यांशु बोरकर ,रमन बोढारे , प्राजक्ता चन्द्रीकापुरे, आंकाशा काटरपवार , हर्ष पोतनवार, निधी नागपुरे , भार्गव नागपुरे आदींनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कल्पतरू कॉलोणीतून दिवसाढवळ्या लॅपटॉप चोरीला..

Mon Feb 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनी मध्ये मागील दोन दिवसात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्याने घरातुन लॅपटॉप चोरीला नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी अजयकुमार सुरेशकुमार श्रीवास्तव वय 50 वर्षे रा कल्पतरू कॉलोनी कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com