स्थानिक गुन्हे शाखा नागपूर जिल्हा ग्रामीण ची कार्यवाही
केळवद :-दिनांक १६/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे केळवद हद्दीत भागेमहारी गावाच्या शिवारातील शेतातील विहारीतून water pump चोरीच्या गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांकडून दोन संशयित इसम व गुन्हयात वापरलेले गाडी बद्दल माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गाड़ी नंबर वरून गाड़ी मालक रा. मंगलवारी नागपुर येथे जाऊन शोध घेतला गाड़ी मालकने ती गाड़ी परीचित व्यक्तीला किरायाने दिल्याचे सांगितले, करिता त्या इसमास सापळा रचून आरोपी नामे १) दीपककुमार शाहू वय ३०, रा. मंगलवाड़ी नागपुर फरार आरोपी २) रामचंद्र चचाने रा भागेमहारी केळवद यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने भागमहारी गावाच्या हद्दीतील २ शेती मधून २ पानडुब्बी मोटर पंप चोरी केल्याचे सांगीतले त्याचे ताब्यातून चोरी केलेल्या २) laxmi कंपनिची ५ hp पानबुडी मोटर पंप किमती अंदाजे ८,०००/- रू. २) टॅक्सी कंपनिची ५hp पनडुब्बी मोटर पंप किमती अंदाजे १०,०००/- रु. ३) एक महिंद्रा जीतो मालवाहक गाड़ी क्र MH ४० BL ०९८८ किमती अंदाजे २,५०,०००/- असा एकून ०२.६८,०००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकिय तपासणी करुन जप्त मुद्देमाल व कागदपत्रासह पोलीस ठाणे केळवद यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार राजू रेवतकर, अमोल कुथे, पोलीस नायक किशोर वानखेडे, आशीष मुगले, उमेश फुलबेल यांनी पार पाडली.