संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आशा हॉस्पिटल समोर नागपूर हुन कामठी कडे येणाऱ्या दुचाकी व वारेगाव बाह्य वळण मार्गाहून येणाऱ्या सहा चाकी आयसर ट्रक वळण घेत असता दुचाकी व ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजता घडली असून मृतक दुचाकी चालक तरुणाचे नाव एहत्येश्याम अहमद वय 26 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी असे आहे.तर ट्रक चालकाने घटनास्थळाहून ट्रक सह पळ काढण्यात यश गाठले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.