संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधि
कामठी ता प्र 30:-स्थानिक कामठी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्थानकाहुन मालवाहकरेल्वे गाडी समोर एका अनोळखी इसमाने उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता या घटनेत सदर अनोळखी इसमाला रेल्वेगाडीची धडक लागल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर रित्या जख्मि झाला होता सुदैवाने जीवितहानी टळली तर वेळीच रेल्वे पोलीस अंमलदार यांनी त्वरित घटनास्थळ गाठून सदर जख्मि इसमाला पुढील उपचारार्थ नागपूरच्या ट्रामा सेंटर मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे हलविण्यात आले होते उपचारादरम्यान या अनोळखी जख्मि इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 दरम्यान घडली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही.
..सदर अनोळखी मृतक हा वय अंदाजे 40 वर्षे असून उंची 5 फूट,चेहऱ्याचा रंग सावळा तर अंगात निळ्या रंगाची टी शर्ट व काळ्या रंगाचा फुल पॅन्ट परिधान करून आहे. तसेच डाव्या हाताची जुनी शस्त्रक्रिया केली आहे तेव्हा सदर अनोळखी मृतकाशी संबंधित नातेवाईकांनी कामठी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे .पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास सुरू आहे.