वैजापूरजवळील अपघात मुख्यमंत्र्यांना दुःख, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये

– जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश

मुंबई :- मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यात 12 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायालय का क्लर्क गिरफ्तार

Mon Oct 16 , 2023
– 127 एक्सीडेंट केस में पीड़ितों को नहीं मिला मुआवजा  नागपुर :- सड़क दुर्घटनाओं में पीड़ितों को मिलने वाले मुआवजे की रकम कोर्ट का क्लर्क ही पचा रहा था. वाहन दुर्घटना दावा न्यायाधिकरण (एमएसीटी) द्वारा दिए जाने वाली मुआवजे की रकम पचाने के लिए क्लर्क ने अपनी पत्नी, रिश्तेदार और विभिन्न संस्थानों के नाम पर खाते खोले. इस तरह 127 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com