गुणवत्तेचे आव्हान स्वीकारा – कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

– विद्यापीठात कुलगुरूंचे हस्ते उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार व वार्षिकांक स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

– विद्यापीठ स्थापनेला चाळीस वर्षे पूर्ण

अमरावती :- जागतिकीकरणानंतर खूप बदल झाले आहे, प्रवाहासोबत आपण चाललो पाहिजे. खाजगी व विदेशी विद्यापीठांशी आपली स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता गुणवत्तेमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरीता गुणवत्तेचे आव्हान सर्वांनी स्वीकारावे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा स्थापना दिन, महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2023 व वार्षिकांक स्पर्धा 2021-22 चे पुरस्कार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एस.व्ही. डुडूल, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.सौ.व्ही.पी. गुडधे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.

उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कारांतर्गत शाल, श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र व रौप्यपदक देवून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य/संचालक स्तरावरील संवर्गात कला व विज्ञान महाविद्यालय, कु­हाचे प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख व भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांचा, संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक संवर्गात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे डॉ. गजानन वाघ व शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाच्या डॉ. प्रियाकुमारी खिल्लारे यांचा, विद्यापीठ स्तरावरील शिक्षक संवर्गात विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांचा, विद्यापीठ प्रथम श्रेणी अधिकारी संवर्गात सहा. कुलसचिव (नामांकन) राहुल नरवाडे व उपकुलसचिव (विकास) डॉ. सुलभा पाटील, विद्यापीठ द्वितीय श्रेणी अधिकारी संवर्गात गोपनीय विभागाचे अधीक्षक माधव कविश्वार यांचा, विद्यापीठ तृतीय श्रेणी कर्मचारी संवर्गात अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता संजय धाकुलकर व आस्थापना विभागातील वरीष्ठ सहाय्यक अनुराधा खडसे यांचा, विद्यापीठ चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गवारीत सारणी विभागातील शिपाई विलास परचाके व रासायनिक तंत्रशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर नेहा बोंडे यांचा आणि संलग्नित महाविद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गात गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुरबाजार येथील वरीष्ठ लिपीक नितीन तसरे व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या प्रयोगशाळा सहाय्यक डॉ. वैशाली देशमुख यांचा, तर नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी स्व. भाष्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, जि. बुलढाणाच्या ‘‘ई-चावडी’’ या वार्षिकांकाकरीता महाविद्यालयाला रु. 5001/- रोख पारितोषिक व गौरव प्रमाणपत्र देवून सत्कार केला.

वार्षिकांक स्पर्धेत शहरी विभागांतर्गत बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या ‘भारती’ या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीच्या ‘प्रतिभा’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसदच्या ‘कल्पना’ या वार्षिकांकास, तर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या ‘इन्नोव्हेटर 2022’ या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड मॅनेजमेंट, बडनेराच्या ‘टेक्नोस्ट्रीम 2022’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिटूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, अमरावतीच्या ‘टेक्नोरिदम 2022’ या वार्षिकांकास तसेच ग्रामीण विभागांतर्गत बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक इंदिरा महाविद्यालय, कळंबच्या ‘कदंबिनी’ या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुरबाजारच्या ‘फुलोर’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक कला व विज्ञान महाविद्यालय, कु­हाच्या ‘आरोह’ या वार्षिकांकास, तर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावतीच्या ‘पोटेन्शिअल 2022’ या वार्षिकांकास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देवून महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले.

मार्गदर्शन करतांना कुलगुरू म्हणाले, काम करण्याची स्फूर्ती मिळावी, कौतुकाची थाप पडावी, या उद्देशाने हा पुरस्कार महत्वाचा आहे. वार्षिकांकामध्ये महाविद्यालयाची प्रगती, सामाजिक घटना, बदल याचे प्रतिबिंब दिसून येते. विद्यापीठाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. हा फारसा मोठा काळ नसून तुलनेने आपण खूप प्रगती केली आहे. विद्यापीठ स्थापनेचा मी साक्षीदार आहे. चार ‘‘ई’’ शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्वाच्या आहेत. एक्सपान्शन शिक्षणाचे खूप होत आहे. पण त्या तुलनेने एक्सलन्स म्हणजे गुणवत्तेमध्ये आपण मागे आहोत. गुणवत्तेबाबत तडजोड करुन चालणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये कमी पडतो आहे, त्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. एकूणच आपल्या विद्यापीठातील विद्याथ्र्यांची गुणवत्ता वाढीचे आव्हान प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे.

इक्वॅलिटी (समानता) – आज प्रत्येकाला समान शिक्षणाची संधी मिळत आहे, ही चांगली बाब आहे. एम्पॉयमेन्टच्या बाबतीत ते म्हणाले, आजचं शिक्षण नोकरीच्या दृष्टीने केल्या जाते. ज्ञानार्जनाच्यादृष्टीने त्यामध्ये कमतरता दिसते. विद्यार्थी स्वत:च्या पायावर कसा उभा राहील, स्कील मनुष्यबळ कसे तयार होईल आणि रोजगाराभिमुख शिक्षण त्याला कसे देता येईल, यासाठी प्रयत्न व आव्हाने प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर विद्यापीठाची स्पर्धा आहे. नवीन शैक्षणिक धोरण भारतात लागू झाले आहे. त्यातील बदल आपण स्वीकारला पाहिजे, त्याची अंमलबजावणी सुद्धा आपल्याला करावयाची आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे विद्याथ्र्यांसाठी फार महत्वाचे आहे. त्याकरीता नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती जास्तीतजास्त विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचावी, अशा सूचना देखील त्यांनी याप्रसंगी केल्यात.

विद्याथ्र्यांच्या भविष्याच्या दृष्टीने रोडमॅप आखण्याची आवश्यकता असून विद्याथ्र्यांना प्रमोट कसे करता येईल, तसेच विद्यापीठ सेंटर ऑफ इन्नोव्हेशन असून त्याही दृष्टीने अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. व्यवस्थापन परिषदेने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्या निर्णयाची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. भविष्यात जास्तीतजास्त स्वायत्त संस्थांची संख्या वाढीची आवश्यकता असून त्यादृष्टीने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाची आर्थिकस्थिती कशी चांगली करता येईल, याकरीता प्रयत्न करणार असल्याचेही सांगून त्यांनी महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन व विद्यापीठ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. अधिष्ठाता डॉ.एस.व्ही. डुडूल, डॉ.व्ही.पी. गुडधे व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी पुरस्कारकत्र्यांचा परिचय करुन दिला. संचालन करीत आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध प्राधिकारिणींचे सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा अन् आझाद पार्क सुधार समितीच्या श्रमदानाने बहरले परिसर

Tue May 2 , 2023
– स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचा सकारात्मक परिणाम  नागपूर :- स्वतःच्या घराची व परिसराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच ‘स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे’ असे म्हटले जाते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची असून, या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. स्वच्छतेची जाणीव ठेवत नागपूर महानगरपालिकेच्या हनुमान नगर झोनचे स्वच्छता कर्मचारी, अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com