नागपूर महानगरपालिकेच्या मध्ये नाग नदी व नाग नाल्याच्या व गटारांच्या ज्या समस्या आहे त्या संदर्भात सर्व झोन ला त्या झोनच्या समस्या देऊन लवकरात लवकर उपयोजना करण्याची आम आदमी पार्टीची मागणी

– आम आदमी पार्टी नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक झोन ला दहाही झोनच्या समस्या घेऊन धडकले

नागपूर :- मागील काळात 23/09/2023 या तारखेला आलेल्या पुरात नागपूर शहरातील नागरिकांच्या घरचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते आणि त्याचबरोबर मानसिक त्रासही खूप झाला .त्याची नुकसान भरपाई फारच कमी लोकांना थोड्या प्रमाणात करण्यात आली आणि तीही त्यांचे लाखोचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्यासाठी ती फार थोडी थोडकी होती.तर अजूनही आज पर्यंत नागरिकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही , तसेच नाग नदी, पिवळी नदी, पोरा नदी या नदीचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले त्याचे कारण म्हणजे नादुरुस्त असलेले गडर लाईन, रस्त्याचे पाणी निघण्याची नाली व सिमेंट रस्ते यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेचे नुकसान झाले. कित्येक लोकांची जीवित हानी होऊन परिवार उद्धस्त झाले. त्याची जबाबदारी कोणीही घेतली नाही, वेळेत संपूर्ण काम झाले असते तर ही वेळ नागरिकांवर आली नसती.

आता काहीच दिवसात पावसाळा सुरु होत आहे परंतु अजूनही गडर लाईन, रस्त्याचे पाणी वाहून नेणारी (स्ट्रॉम वॉटर )लाईन दुरुस्त झाली नाही किंवा त्याची साफ सफाई करण्यात आली नाही.

नागपूर महानगरपालिकेला आम आदमी पार्टी तर्फे वारंवार विनंती करून सुद्धा कर्मचारी व अधीकारी यांनी पाहिजे त्या प्रकारचे काम केले नाही. आता येणाऱ्या पावसात आर्थिक व जीवित हानी झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगर पालिका व नागपूर जिल्हाधिकारी यांची राहील. अशा प्रकारचे निवेदन प्रत्येक झोनच्या समस्या त्या झोनमध्ये देऊन आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व नागरिक प्रत्येक झोनला धडकले.

सर्व समस्या चा विचार करून लवकरात लवकर योग्य कार्यवाही करावी अन्यथा या मुद्यावर जन आंदोलन करण्यात येईल असे आम आदमी पार्टी तर्फे इशारा देण्यात आला.

नागपूर शहरांमधील 10 महानगरपालिका झोनला आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी सोबत नागरिकांनी निवेदने दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खेळांमुळे निर्माण होणारी खेळाडूवृत्ती महत्वाची महावितरणचे संचालक अरविंद भादिकर यांचे प्रतिपादन

Thu May 30 , 2024
– विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन पुणे :- ‘खेळांमुळे खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व हेच गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही पराभवाला सामोरे जाऊन, त्यावर मात करून नवीन भरारी घेण्याची वैयक्तिक व सांघिक जिद्द निर्माण होते’, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांनी बुधवारी (दि. २९) केले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अखिल भारतीय विद्युत क्रीडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com