कन्हान पो.स्टे. ला चार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.
कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान शहरातील आंबेडकर चौक जवळील लाॅक डाऊन पानटपरी जवळ भरदिवसा चार आरोपींनी एका युवकाच्या उजव्या सिटवर चाकुने मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीस सटेशन ला चार आरो पी विरुद्ध गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.४) नोव्हेंबर ला दुपारी २ वाजता दरम्यान अमीत भारत तपस्वी वय१८ वर्ष रा.हरीहर नगर कांद्री हा आपला मित्र सोपान राम भरोसे ठाकरे यांच्या दुचाकीने पिपरी वरून हरिहर नगर कांद्री येथे जात असतांना आंबेडकर चौकातील लाॅकडाऊन पानटपरी जवळ तेनाली, प्रशांत, सनी, जितु हयानी गाडी समोर धावत येवुन दुचाकी थाबंविली व तेनालीने चाकु मारण्याकरिता काढला असता अमित तपस्वी ने तेथुन पळुन जाणाच्या प्रयत्न केला असता तेनाली यांनी अमित तपस्वीच्या उजव्या सिटवर चाकु ने मारून गंभीर जख्मी केल्याने अमित तपस्वी हा कसातरी तेथुन पळुन गेला. आणि प्रशांत, सन्नी, जितु हे अमित तपस्वी याचा मित्र सोपान ठाकरे याच्या मागे धावत गेले. सदर प्रकरणी फिर्यादी अमित तपस्वी यांच्या तक्रारीेने कन्हान पोलीसानी आरोपी तेनाली, प्रशांत, सन्नी व जितु विरुद्ध कलम ३२४, ३४ भादंवि ४,२५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड काॅंस्टेबल नरेश वरखडे, पोलीस शिपाई कोमल खैरे हे पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.