संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 11 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुन्या वैमनस्यातून आरोपीने जखमीच्या घरासमोर उभे राहून जख्मि तरुणाच्या डोक्यावर, मानेवर, डाव्या हाताच्या मनगटावर व उजव्या हाताच्या पंज्यावर चाकूने वार करून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून गंभीर जख्मिचे नाव किसना सुधाकर तूपट वय 40 वर्षे रा येरखेडा तर आरोपीचे नाव मुकेश रामकृष्ण अंबाडरे वय 21 वर्षे रा येरखेडा असे आहे.यासंदर्भात जख्मि फिर्यादी किसना तुपट ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मुकेश अंबाडरे विरुद्ध भादवी कलम 326 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर जख्मि व आरोपी हे दोघेही शेजारी असून मागील चार महिन्यांपूर्वी जख्मि व त्याची पत्नीचे जोरदार भांडण सुरू असताना भाडण सोडवायला गेलेला आरोपी च्या भावाला जख्मिने जोरदार धक्का दिल्याने आरोपीच्या भावाच्या डोक्याला किरकोळ जखम झाली होती या घटनेचा राग मनात धरून आरोपीमे काल रात्री जख्मि इसमावर जीव घेण्याच्या उद्देशाने चाकूने सपासप वार करून गंभीर जख्मि केले.दरम्यान रक्तबंबाळ स्थितीत असलेल्या जख्मि किसना तुपट ला नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविले मात्र परिस्थिती नाजूक असल्याने जखमीला नागपूर च्या मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले .वेळीच शेजाऱ्यांनी मदतीची धाव घेत उपचारार्थ हलविल्याने जीवितहानी टळल्याचे बोलले जाते.