संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन जवळील किलोमीटर क्र 1165/ 5 वर नागपूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालगाडीसमोर एका 26 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 8 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव शुभम विलास वाहने रा.रमानगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस श्रीधर पेंडर व मेश्राम यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवीत मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही तर मृतकाच्या पाठिमागे आई, वडील व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.