एमआयडीसीतील उद्योगांना होईल सिंदी ड्राय पोर्टचा लाभ : केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी

नागपूर :- सिंदी ड्रायपोर्ट सुरू झाल्यावर विदर्भातील उद्योगांना निर्यातीसाठी एक सशक्त माध्यम उपलब्ध होणार आहे. एमआयडीसीमधील उद्योगांना याचा विशेषत्वाने खूप फायदा होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.

एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. नितीन गडकरी बोलत होेते. यावेळी एमएसएमईचे संचालक पार्लेवार तसेच असोसिएशनचे पदाधिकारी सी.एम. रणधीर, मोहन, अरुण लांजेवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

ना. गडकरी यांनी एमआयडीसी परिसरातील पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यासंदर्भात तसेच येथील उद्योगांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याची सूचनाही केली. बुटीबोरीतील औद्योगिक वसाहत खूप मोठी आहे. याठिकाणी बराच विकास झाला आणि आणखी बरीच कामे भविष्यात होणार आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sun Mar 3 , 2024
पुणे :- स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी ही दोन्ही स्मारक स्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी असावीत यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तुळापूर येथे स्वराज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights