संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- संततधार पावसा मुळे प्रभाग 15 तील गौतम नगरमधील सार्वजनिक विहिर नुकतीच खचली सार्वजनिक विहिर खचल्या मुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून नगर परिषद प्रशासनाने तातडीने विहिर बुझवावी अशी मागणी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केली आहे.
संततधार पावसामुळे गौतम नगर छावनी येथील निलेश आवरेकर यांच्या घराजवळील विहिर चार दिवसापूर्वी दिवसा ढवळ्या खचली विहिरीच्या आजुबाजुला मोठा खड्डा पडला असून सुदैवाने प्राणहानी टळली आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत खचलेली विहिर पूर्णता बुझवावी अशी मागणी माजी नगरसेविका संध्या रायबोले, माजी नगरसेविका प्रतिभा देशभ्रतार, माजी नगरसेवक राजू देशभ्रतार यांच्या सह परिसरातील निलेश आवरेकर,अविनाश गजभिये, प्रभुदास श्यामकुवर, सौरभ पौनिकर, माधुरी गजबे, संजू शेंडे, दर्शना पौनिकर, अनिल बोरकर, नवीन गजभिये आदी नागरिकांनी केली आहे