आजनी येथे शिवजयंती उत्सव साजरा, रक्तदान शिबिर संपन्न 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील आजनी येथे दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा १९ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातून एक फेरी काढल्यानंतर जिजाऊ उद्यान परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करून गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील अनेक मान्यवर तथा शिवप्रेमी उपस्थित होते.

प्रियंका घोडे आणि बुंदेले  यांनी शिवगर्जना करून मानवंदना दिली तर मातोश्री योगासन महिला मंडळ यांनी शिवस्तुती सादर केली तसेच अल्पोहाराचे आयोजन केले. जिल्हा परिषद शाळा आजनीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य आणि लेझीम सादर करून मंत्रमुग्ध केले. यावेळी सौंदर्यीकरणासाठी मेहनत घेणारे सुधाकर विघे व गोपीचंद जेवडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे यंदा सुध्दा नवयुवक युवा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिरात २८ दात्यांनी रक्तदान केले. संकलन लाईफ लाईन ब्लड बँकेने केले.

शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमासाठी ग्राम पंचायत आजनी, नवयुवक युवा मंडळ, वीर बजरंग क्रीडा मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ, सावित्रीबाई ज्योतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालय, रेणूका क्रीडा मंडळ तसेच गावातील सर्वच शिवप्रेमींनी सहकार्य केले. गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी जिजाऊ उद्यान परिसरातील सौंदर्यीकरणासाठी दान देऊन हातभार लावला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकशाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडेल आदर्श - पुज्यनिय भदंत नागदीपंकर

Mon Feb 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- 21 व्या शतकातील लोकशाही राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडेल हे आदर्श आहे त्यासाठी यांचा आदर्श घेऊन समाज निर्मिती करावी.राष्ट्र ,समाज व संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध असणारा आणि कोणत्याही त्यागाला,संघर्षाला कटिबद्ध असणारा समाज घडला तरच उद्याचा भारत दहशतमुक्त,भयमुक्त,भ्रष्टाचार मुक्त,व्यसनमुक्त आणि विज्ञानिष्ठ संस्कारित समाज निर्माण होईल असे मौलिक प्रतिपादन पुज्यनिय भदंत नागदिपंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com