संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21: वीर बजरंगी सेवा संस्था महाल नागपूरच्या वतीने नागपूर ते रामटेक गड मंदिर मोटार सायकल शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शौर्य यात्रेचे कामठी तालुक्यातील रनाळा पंकज मंगल कार्यालय चौकात ढोल ताशे पताका, बँड, डीजे, फटाक्याच्या आतिषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते भगवान श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची पूजा आरती करून शौर्य यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव कपिल गायधने, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान, भूषण सावरकर, शुभम नवले ,कामठी तालुका भाजप अध्यक्ष उमेश रडके, शौर्य यात्रेचे श्रीकांत आगलावे, निलेश टेकाळे ,चेतन खडसे ,रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच पंकज साबळे, येरखेडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच मनीष कारेमोरे, जयराज नायडू, सुनील खानवाणी ,उपसरपंच अंकिता तळेकर ग्रामपंचायतचे सदस्य स्वप्निल फुकटे, प्रदीप सपाटे ,अरविंद डोंगरे ,माजी सरपंच देवराव आमधरे, रणाळा भाजप अध्यक्ष सुनील मोहोळ ,गजानन तिरपुडे ,कुलदीप पाटील, कुबेर महाले, प्रशांत साबळे, गोलू सुबनवार, निलेश गेडाम, श्रावण केळझरकर,सौमित्र नंदी, नरेश चकोले, मुकेश दुर्गे ,मनोज धानोरकर ,सुभाष राऊत, अशोक ठाकरे ,विजय दलाल ,सतीश नवले, मधुकर गिरी, शेषराव आढाऊ,शंकर सोनटक्के, विशाल गिरी ,मुकेश बडगे, दिलीप चांदवडकर ,बॉबी महेंद्र ,अमोल नागपुरे,प्रा पराग सपाटे, रोहन कुलरकर ,सुनील खानवाणी, सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.