अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारा ट्रक पकडला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– पोलीस अधिक्षक विशेष पथकांची कारवाई , वीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान :- पोलीस स्टेशन जवळ गांधी चौक येथे नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विशेष पोलीस पथकाने नाकाबंदी करुन विना राॅयल्टी वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रक ला पकडुन वीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

प्राप्त प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२६) ला रात्री ११.३० वाजता दरम्यान नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विशेष पोलीस पथकाने कन्हान परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती मिळाली कि, दहा चक्का टिप्पर ट्रक आमडी फाट्याकडुन कन्हान मार्ग कामठी कडे अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक करित आहे . अश्या माहिती वरुन पोलीसांनी गांधी चौक येथे नाकाबंदी केली असता एक टिप्पर ट्रक आमडी फाट्याकडुन कमठीच्या दिशेने जात असतांना दिसुन आला. पोलीसांनी त्यास थांबवुन परिचय देऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वाळु दिसुन आल्याने पोलीसांनी ट्रक चालकाला वाळु बाबत राॅयल्टी विचारली असता त्यांनी इटीपी क्र. ११५७८०० ९ ची राॅयल्टी दाखविली. सदर राॅयल्टी बाबत पोलीसांनी माइनिंग हेल्पलाइन क्र. ०२०६७८००८०० वर फोन करुन इटीपी नंबर सांगुन राॅयल्टी बाबत विचारणा केली असता ५ ब्रास वाळुची राॅयल्टी ही वाहन मालक दिनेश ढोके यांचा नावानिशी दि.१६ जुन ला शासना द्वारे देण्यात आली होती. सदर वाहनावर कोणतीही राॅयल्टी नसल्याचे चौकशी दरम्यान दिसुन आल्याने पोलीसांनी १) अशोक लेलैंड कंपनीचा दहा चक्का टिप्पर ट्रक क्र. एम एच ३४ एफ ३४७८ किंमत वीस लाख रुपये, २) अंदाजे ५ ब्रास वाळु प्रत्येकी ५००० रु प्रमाणे २५,००० रुपये , ३) विवो कंपनीचा मोबाइल किंमत ५,००० रुपये असा एकुण २०,३०,००० रुपयां चा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले.

सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी सहायक पोलीस निरीक्षक अमित पांडे यांचा तक्रारी वरून आरोपी १) क्रिष्णकुमार सुरज गोपाले, २) राजन रामेश्वर मांडरे दोन्ही रा.खरबी, ३) दिनेश ढोके रा.भंडारा यांचे विरुद्ध अप क्र. ७९७/२३ कलम ४२०, ३७९, १०९, ३४ भादंवि सहकलम ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंदिराच्या आमिषाला बळी पडू नका! काँग्रेसच्या स्थापनादिनी मल्लिकार्जुन खरगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Fri Dec 29 , 2023
नागपूर :- देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही. अशा महत्त्वाच्या मुद्दयांकडे दुर्लक्ष करून मोदी सरकार आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून राम मंदिराच्या विषयाला महत्त्व देत आहे. मंदिराचे भजन घेऊनच भाजप सरकार निवडणुकांना पुढे जाईल. परंतु, या आमिषाला बळी नका, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. खरगे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com