महामार्ग क्राॅस बॅरियर ला ट्रकने धडक मारल्याने ट्रक चालकावर गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन कि मी अंतरावर खंडाळा शिवारात एका ट्रक चालकाने ओरि एंटल कंपनी चे क्राॅस बॅरियर ला धडक मारून तोडफो ड करुन नुकसान केल्याने कन्हान पोलीसांनी तक्रारी वरून ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.२८) मे २०२२ ला सकाळी ८.४५ ते ९ वाजता दरम्यान ट्रक क्रमांक एम एच ४० सीडी ६७४० च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन खंडाळा शिवारातील ओरिएंटल नॅशनल बायपास कंट्रक्शन कंपनीने महामार्गाचा बाजुला लावलेला क्राॅस बॅरियर ला धडक मारून ८ मीटर क्राॅस बॅरियर किंमत अंदाजे ३८,००० रूपयाचे नुकसान केल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी दिलीप बावने यांच्या तक्रारी वरून ट्रक चालका विरुद्ध कलम २७९ , ४२७ भादंवि सह कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपी ट्रक चालकाचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com