– पोलीस स्टेशन मौदाची कारवाई
मौदा :- दि. ०१/१०/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पोस्टे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पेट्रोलींग दरम्यान मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून मौजा झूल्लर फाटा येथे अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. य माहिती वरून फिर्यादी हे हायवे क्र. एन एच ५३ वर पेट्रोलींग करित असता झूल्लर फाटा मौदा येथे अवैधरित्या व विनापरवाना वाळूची चोरटी वाहतुक करणाच्या सिल्वर रंगाचा आयशर कंपनीचा ट्रॅक्टर लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॅक्टरची ट्रॉलीचा चालक आरोपी नामे- यशवंत नत्थु मोटघरे, वय ४२ वर्ष, रा. झुल्लर फाटा मौदा याने आपल्या वाहनामध्ये रेती भरून दिसून आल्याने त्यातील आरोपीच्या ताब्यातून एक ब्रास रेती किंमती ४,०००/- रु. व ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४०/ सी ए ५७४६ किंमती ५,००,०००/- रु. व एक लाल रंगाची विना कमांकाची ट्रॅक्टरची ट्रॉली किंमती अंदाजे १,००,०००/- रु. असा एकुण ६,०४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नाम- पोलीस हवालदार संदीप कडु व. नं. ४१८ पोस्टे मादा यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास महिला सहायक फौजदार प्रतिभा तेलगोटे या रीत आहे.