मनपाच्या “आपदा मित्र” उपक्रमासाठी एकूण ९२६ अर्ज प्राप्त

नागपूर :- शहरात उद्भवणाऱ्या आपत्ती व अतिवृष्टी कालावधीत सहकार्य करण्यासाठी मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाद्वारे “आपदा मित्र/सखी” उपक्रम राबविण्यात येणार असून, उपक्रमाला सर्वसामान्य नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुक उमेदवाराचे एकूण ९२६ अर्ज मनपाला प्राप्त झाले आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात शहरात “आपदा मित्र” उपक्रम राबविण्यात येत आहे.

उपक्रमाबद्दल माहिती देत मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी सांगितले की, केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार शहरात ‘आपदा मित्र’ ची नियुक्ती करण्याचे प्रस्तावित आहे. शहरातील दहाही झोनमध्ये प्रत्येकी १५ याप्रमाणे एकूण १५० ‘आपदा मित्र’ ची निवड केली जाणार आहे.

शहरात उद्भवणाऱ्या आपत्ती व अतिवृष्टी समयी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी “आपदा मित्र” मदत करणार आहेत. मनपाद्वारे उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५० पदांकरिता ९२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातून आपदा मित्र यांची निवड करण्यात येणार असून, या स्वयंसेवकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करून प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे. यात त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या संकल्पनांची ओळख करून दिली जाईल. तसेच शोध आणि बचाव कार्याविषयी प्रशिक्षण, अग्निशामक यंत्रांची माहिती, मूलभूत प्रथमोपचार, लाईफ सपोर्ट इत्यादींविषयी प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे.

आपदा मित्र या उपक्रमाकरिता पात्रतेसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. शारीरिक क्षमतेनुसार पात्र असलेल्या अर्जदारांना निवडले जाईल व त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत दिले जाईल. शारीरिक निकष हा सर्वात महत्त्वाचा पात्रता निकषांपैकी एक आहे. उपक्रमानुसार आपदा मित्र उपक्रमाच्या अर्जदारांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Farmers to get income by selling surplus power generated in solar pumps -  DCM Devendra Fadnavis says scheme to be launched

Fri Sep 13 , 2024
Mumbai :-State has witnessed transition from farmers waiting for years to get grid connection for agriculture pumps to getting pumps on demand thanks to Solar Agriculture Pump on Demand (SAPD) scheme of the state government. A scheme will be launched to facilitate additional income to farmers by selling surplus power generated in their solar pump sets, said  Deputy Chief Minister […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com