अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यात मागील आठ दिवासांपासून मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. याच पावसाचा फटका गोंदिया शहरातील सुर्याटोला परीसरातील तसेच मुख्य रस्त्यावर पाणी, एकता काँलनीत पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. तर या परीसरातील मुख्य रस्त्यावर पाणी खाल्या आल्याने रस्त्यावर डोंगरा भर पाणी वाहत आहे.
पाण्यातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थाना तसेच वाहनधारकांना या पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे तर मुख्य या परीसरात वीज वितराणचे कार्यालय असल्याने नागरीकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांना कमालीचा त्रास सहन करावे लागत असून नागरिकांनी आपला रोष नगर प्रशासनाच्या नियोजन शुन्य धोरणावर व्यक्त केला आहे.