संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– एक आरोपी अटक, ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
– पोलीस अधिक्षक विशेष पोलीस पथकाची धडक कारवाई.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड चौक येथे नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशेष पोलीस पथकांनी नाकाबंदी करुन अवैध वाळु वाहतुक कर णाऱ्या सोळा चाकी टिप्पर ट्रक ला पकडुन ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसां कडुन प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.३) मे ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशेष पोलीस पथक अवैध धंधे रेड कामी खाजगी वाहनाने कन्हान परिसरात पेट्रो लिंग करित असतांना गुप्त बातमी मिळाली कि मनसर कडुन कन्हान कडे एक टीप्पर वाहन अवैधरित्या विना परवाना रेती भरून नागपुर कडे वाहतुक करित आहे. अश्या मिळालेल्या माहितीवरुन पोलीसांनी तारसा चौक येथे नाकाबंदी करून मनसर कडुन येणारा संश यित सोळा चक्का टिप्पर ट्रक क्र. एमएच ४० सी एम ७७५२ ला थांबवुन चालकास नाव विचारले असता त्याने अरविंद जगदिश संकेत वय २५ रा. ग्राम देवरी तह. बहेरी, जिल्हा सिदी, ह.मु चनकापुर काॅलोनी तह सावनेर, जिल्हा नागपुर असे सांगितल्याने पोलीसांनी वाहनाची झडती घेतली तर वाहनात मोठ्या प्रमाणात वाळु दिसुन आल्याने पोलीसांनी वाहन चालकास रेती बाबतचा परवाना विचारला असता चालकाने नसल्या चे सांगितले. सदर अवैध चोरीचे वाळुने भरलेले वाहन हे बामणी तह. तुमसर जिल्हा भंडारा येथील अवैधरित्या सुरु असलेल्या रेती स्टाॅकवरुन वाहन मालक बलराम यादव यांचे भाऊ व बिझनेस पार्टनर क्रिष्णा यादव रा. चनकापुर काॅलोनी तह सावनेर यांचे सांगणे वरुन टिप्पर ट्रक भरुन नागपुर येथे नेत असल्याचे चालकाने कबुल केल्याने पोलीसांनी वाहन चालक अरविंद संकेत याला अटक करुन त्याचा जवळुन टिप्पर ट्रक क्र. एमएच ४० सी एम ७७५२ किंमत ४०,००,००० रु, दहा ब्रास वाळु किंमत ५०,००० रु, एक एंड्राइड ऑनर कंपनीचा मोबाइल किंमत १०,००० रु असा एकुण ४०,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सरकार तर्फे फिर्यादी सपोनि किशोर आनंदराव शेरकी यांचा तक्रारीवरून आरोपी १) अरविंद संकेत, २) बलराम यादव, ३) क्रिष्णा यादव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असुन दोन आरोपीचा शोध घेत आहे.
सदर कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक विशेष पथकातील सपो निरीक्षक किशोर शेरकी, प्रणय बनाफर, कार्तिक पुरी, बालाजी बारगुले सह पोलीस कर्मचारी हयांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.