संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील काही दिवसापासून कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात वाघाची दहशत पसरली असून गादा,वरंभा गावातील गाईवर वाघाने हल्ला चढविल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.या घटनेच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच काल श्री गणेश विसर्जन दिवशी 17 सप्टेंबर ला दिवसा ढवळ्या दुपारी 3 वाजता बोरगाव गावातील बाळाजी मेश्राम यांच्या शेतात चरत असलेल्या गाईवर हल्ला चढविल्याची घटना घडली ज्यामुळे गाय गंभीर जख्मि झाली. तर या घटनेने सर्वत्र भीतीमय वातावरण पसरले आहे.तर त्याच परिसरात काम करीत असलेले मनोहर प्रगट नामक व्यक्ती सुदैवाने बचावले.
घटनेची माहिती मिळताच गावातील लोकप्रतिनिधी सचिन भोयर यांनी त्वरित घटनास्थळ गाठून संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा करण्यास भाग पाडले. यासंदर्भात घटनेची नोंद केली असून गावातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.