नागपूर :-दिनांक 16 ऑगष्ट 2016 पासून भारतरत्न तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या फोटो छायांकन डाक तिकीट काढण्यासाठी सर्वप्रथम देशात मागणी केली होती व सतत संघर्ष करुन पाठपुरावा करून आजही लढा देत आहोत. दरवर्षी जयंती व पुण्यतिथी निमित्त आम्ही लेखी निवेदन दिले आहेत. परंतु दुर्दैवाने सांगावे लागते की, 6 वर्षे झालीत तरीही मागणी पूर्ण झाली नाही. ही शोकांतिका आहे. अटलबिहारी वाजपेयी हे 3 वेळा पंतप्रधान राहिले. 10 वेळा लोकसभा व राज्यसभा चे खासदार राहिले आहे ते भाजपा चे प्रथम अध्यक्ष राहिले आहे. त्यांनी पक्षासाठी व देशहितासाठी अनेक कार्य केले आहे. ते विरोधी पक्ष नेते होते. तरी अवहेलना होत आहे. करीता दिनांक 25/12/2024 ला 100 व्या जयंतीनिमित्त शंभर रूपयांचे नाणे व छांयाकित डाक तिकीट काढण्याची मागणी अखिल भारतीय सर्वे वर्गीय कलार समाज तर्फे अध्यक्ष व माजी उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहर भूषण दडवे यांनी लेखी निवेदन सादर करून केली आहे. भारत रत्न तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 25 डिसेंबर 2024 रोजी 100 व्या जयंतीनिमित्त शंभर रूपयांचे नाणे व छांयाकित डाक तिकीट काढण्याची मागणी संदर्भात विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी व निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे मार्फेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह दुरसंचार मंत्री अनुराग ठाकूर यांना दिनांक 4/12/2024 ला लेखी निवेदन पाठविण्यात आले आहे. अखिल भारतीय सर्वे वर्गीय कलार समाज व माजी उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहराचे भूषण दडवे यांनी कळविले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्ताने शंभर रूपयांचे नाणे व छांयाकित डाक तिकीट काढण्याची मागणी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com