– आमडी फाट्याजवळील आमडी चौरस्त्यावरील घटना
– नातीन, मुलासह आईचाही जागेवरच मृत्यु
– ट्रकखाली आल्याने जागेवरच मृत्यु
– मुलगा बचावला, गंभीर जखमी
– संतापलेल्या नागरीकांचा तब्बल दोन तासांपर्यंत ‘ चक्काजाम
– स्थानीक कोणत्याही राजकियांची हजेरी नाही
– अंडरबायपासची मागणी धरली रेटुन
रामटेक :- नागपुर – जबलपुर महामार्गावर असलेल्या व विशेषतः ‘ अपघातासाठी ‘ चर्चीत असलेल्या आमडी फाट्याजवळील आमडी गाव चौरस्त्यावर आज दि. २९ एप्रील च्या सकाळी ११ च्या सुमारास भिषण अपघात झाला. यात ट्रकखाली आल्याने आई, मुलासह एका ७ वर्षीय नातीन चा जागेवरच करून अंत झाला. तर १३ वर्षीय नातु गंभीर जखमी असुन त्याला नागपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृतक हे पिटेसुर गोधनी रेल्वे नागपुर येथील रहीवाशी होते व नागपुर कडुन जबलपुर च्या दिशेने जात होते.
भागवताबाई बावणे ( ५६ ), विक्की बावणे (३६), इशानी विक्की बावणे ( ७ ) अशी मृतकांची नावे असुन युग विक्की बावणे (१३) हा बचावला असुन तो गंभीर जखमी झाल्याने त्याला नागपुर येथे हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तथा नागपुर – जबलपुर महामार्गावरील अपघातासाठी चर्चित असलेल्या आमडी फाट्याजवळील आमडी चौरस्त्यावर आज सकाळी ११ च्या सुमारास मृतक हे दुचाकी क्र. एम.एच. ४० सी. ५२२८ ने नागपुरहुन जबलपुर कडे जात असतांना कंटेनर खाली येऊन बावणे परिवारातील तिघांचा करूण अंत झाला. तर १३ वर्षीय युग हा बावणे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नागपुर येथे हलविण्यात आले आहे. यावेळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघात एवढा भिषण होता की पहाणाऱ्यांचा संताप अनावर झाला व नागरीकांनी येथे तब्बल तास दोन तास चक्काजाम केला. परीणामस्वरूप पाच ते सात किलोमिटर पर्यंत वाहनांची रिघ लागलेली होती. लवकरच येथे रामटेक चे उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे व ठाणेदार यादव आपला पोलीस ताफा घेऊन तैनात झाल्याने पुढील अनर्थ टळला व वाहतुक व्यवस्था सुरळीत केली. लागलीच गंभीर जखमी मुलाला नागपुर येथे तर मृतकांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.
अंडरबायपासची मागणी धरली रेटून
दरम्यान तब्बल तास दिड तास चक्काजाम करून नागरीकांनी एन.एच.ए.आय. विरोधात मोठा रोष व्यक्त केला. पोलिस प्रशाषनाने नागरीकांची समजुत काढुन चक्काजाम आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला मात्र नागरीक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. यावेळी त्यांनी ‘ येथे अंडरबायपास त्वरीत करा ‘ अशी मागणीच रेटून धरली. कित्येक निवेदने दिलीत मात्र एन.एच.ए.आय. चे अधिकारी ऐकत नसल्याचे नागरिकांचे यावेळी म्हणणे होते.
स्थानिक एकाही राजकियाची हजेरी नाही
एवढा मोठा भिषण अपघात झाल्यावर व विशेषतः आमडी परिसरातील नागरीकांनी एवढे मोठे चक्काजाम आंदोलन केल्यावर ‘ आमचा रामटेक विधानसभा क्षेत्र ‘ म्हणुन मिरविणाऱ्या स्थानिक एकाही राजकिय नेत्याने घटनास्थळी हजेरी लावली नाही व नागरिकांच्या समस्या समजुन घेत मागणी असतांनाही काम न करणाऱ्या एन.एच.ए.आय. च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले नाही.