दीक्षाभूमीवर रमाईचा पुतळा उभारणार – विलास गजघाटे

नागपूर :महिला मंडळ आणि आंबेडकरी जनतेच्या मागणीवरून दीक्षाभूमीवर आई रमाईचा पुतळा उभारण्यात येईल असे आश्वासन दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी केले.

पत्रकार भवन येथे सभागृहात आज राजमाता माँ जिजाऊ, आई सावित्रीफुले व फातिमा शेख यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन प्रबुद्ध महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख अतिथी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे बोलत होते. यावेळी प्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कमलाबाई भगत उपस्थित होत्या. यावेळी प्रा.रंजना सुरजुसे, एडवोकेट स्मिता ताकसांडे, संध्या बोरकर, शिला तेलंग, तरला कांबळे यांची भाषणे झाली.

प्रास्ताविक मीना मून यांनी केले व आभार चंद्रकलाताई दुपारे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रदीप मून यांनी केले. यावेळी बोलताना विलास गजघाटे म्हणाले की, माता जिजाऊ, रमाई व फातिमा शेख या महिलांच् प्रेरणास्थान आहे. रमाईचा पुतळा नागपुरात कुठेही नसल्यामुळे हा पुतळा दीक्षाभूमीवर व्हावा. असा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. त्यापुढे बहुजन समाजाच्या महिलांनी बुद्ध धम्माच्या प्रवाहात आले तरच त्याची प्रगती होत असल्याचे मत प्रभाकर दुपारे यांनी वक्त केले.

कार्यक्रमाला चित्रकार सुरेश मून, गौरीशंकर सावनकर, मीना खैरकर व संघमित्रा पाटील आणि गजानन पाटील आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जैन क्लब,भारतीय जैन संगठन का दो दिवसीय प्लास्टिक सर्जरी कैंप संपन्न

Fri Jan 13 , 2023
नागपुर :-जैन क्लब व भारतीय जैन संगठन की ओर से न्यू एरा हॉस्पिटल के सहयोग से अमेरिका से आए डॉक्टर लैरी विंस्टन, डॉ.बैरी सिट्रॉन, डॉक्टर लिंडा पैलर्सन, डॉक्टर लॉरेंस ब्रेन द्वारा 235 रोगियों का परीक्षण किया गया व 53 रोगियों की प्लास्टिक सर्जरी की गई। प्लास्टिक सर्जरी उन बच्चों की की गई जिनके होंठ जन्म से दो भाग में हो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com