संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– तिघास अटक , 17 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्त झोन 5 पोलीस उपयुक्त श्रवण दत्त च्या विशेष पोलीस पथकाने जनावरे तस्करीचा ट्रक लिहीगाव शिवारात पकडून 30 जनावरांना जीवदान देऊन तिघास अटक करून 17 लाख 21 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवार ला रात्री साडेदहा वाजता सुमारास केली पोलीस उपआयुक्त श्रवण दत्त यांनी तयार केलेल्या विशेष पोलीस पथकाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी शेख सकील शेख खलील वय 34, राहणार भाजी मंडी कामठी शेख निसार मुस्ताक कुरेशी वय 32 मदन चौक कामठी ,सय्यद फारूक सय्यद रशीद वय 33 राहणार कमल हसन सोसायटी पांजरा नागपूर यांनी ट्रक क्रमांक एम एच 27, एक्स 5825 मध्ये बिना परवाना अवैधरीत्या मध्य प्रदेशातून 30 जनावरे कोंबून नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने लिहीगाव शिवारातून कामठी येथील भाजीमडी परिसरातील अवैध कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना झोन फाईव्ह चे डीसीपी श्रवण दत्त यांनी तयार केलेल्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सोमवारला रात्री साडेदहा वाजता सुमारास लिहीगाव शिवारात जनावरे भरून जात असलेला ट्रक थांबवून चौकशी केली असता ट्रकमध्ये 30 जनावरे निर्दयतेने कोबुन कामठी येथील भाजीमंडी कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचे उघडकीस आले पोलिसांनी जनावरे भरलेला ट्रक नवीन कामठी पोलीस स्टेशनला आणून 30 जनावरे नवीन कामठी पोलीस परिसरातील गोरक्षनालयात सुरक्षित ठेवण्यात आले जनावराची किंमत दोन लाख रुपये, ट्रकची किंमत 15 लाख ,तीन मोबाईल फोन 21400 एकूण 17 लाख 21 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नवीन कामठी पोलीस स्टेशनला आरोपी शेख शकील शेख खलील ,शेख निसार मुस्ताक कुरेशी ,सय्यद फारुख सय्यद रशीद यांचे विरोधात कलम 5 (अ )(1 )(ब) (9 ) महाराष्ट्र पाणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.
वरील कारवाई विशेष पोलीस पथक चेपोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत थारकर, पंकज भोपळे ,पोलीस उपनिरीक्षक आशिषसिंग ठाकूर ,हेड कॉन्स्टेबल महादेव घाटे ,रामचंद्र कारेमोरे ,रामनरेश यादव, गौतम रंगारी, राजेंद्र टाकळीकर ,निखिल जामगडे ,टप्पूलाल चूटे ,विशाल नागभिडे, आशिष पवार यांच्या पथकाने केली.