संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20:-केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांनी कामठी तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमची सखोल पाहणी करून संबंधित नोडल अधिकारी , सहकारी अधिकारी यांच्याशी वार्तालाप करून कामठी विधानसभा मतदार संघातील लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा पूर्वतयारीचा आढावा घेतला.आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.तसेच मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांना भेट देऊन मतदानाची टक्केवारीब वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या.
याप्रसंगी तहसिलदार गणेश जगदाडे, आदर्श आचार संहिता नोडल अधिकारी संदीप बोरकर, नायब तहसीलदार राजाराम बमनोटे,नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर आदी उपस्थित होते.