गुरूव्दारा कमिटीच्या मदतीने मृताच्या पार्थिवावर अंन्त्यसंस्कार

– धावत्या रेल्वेतून पडून ट्रक चालकाचा मृत्यू

-छत्तीसगढ एक्सप्रेसमधील घटना

नागपूर :- धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या ट्रक चालकाच्या पार्थिवावर गुरूव्दारा कमिटीच्या सहकार्याने गंगाबाई घाट येथे अंन्त्यसंस्कार करण्यात आले. नेदरासिंग पुरनसिंग (70), रा. अमृतसर असे मृतकाचे नाव आहे. ही घटना नरखेड रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

नेदरासिंग हे ट्रक चालक आहेत. रायपुरला काम मिळाल्याची माहिती त्यांनी घरी दिली आणि रायपूरसाठी रेल्वेने निघाले. छत्तीगढ एक्सप्रेसने प्रवास करीत असताना मध्यरात्री अचानक त्यांचा तोल गेला आणि खाली पडले. मागून येणार्‍या मालगाडीच्या लोकोपायलटने ही माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. त्यांच्या मार्फत नागपूर लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळाली. एएसआय विजय मरापे आणि पोलिस शिपाई अमोल हिंगवे यांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृताजवळ आधार कार्ड, मोबाईल आणि 500 रुपये मिळाले. फोनव्दारे मृताच्या नातेवाईकांना सुचना देण्यात आली. मृताचा भाउ, बहिण आणि भाचा नागपुरात आले.

मृताचे कुटुंब अंन्त्यसंस्काराचा खर्चही उचलू शकत नव्हते. त्यामुळे विजय मरापे यांनी गड्डीगोदाम येथील गुरूव्दारा कमिटीशी संपर्क साधला. कमिटीचे अध्यक्ष सुखविंदरसिंग आणि सचिव मेजरसिंग यांनी अंन्त्यसंस्कार तसेच मृताच्या नातेवाईकांचा खर्च उचलला. शनिवारी सकाळी मृताच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांना अमृतसर जाण्याची व्यवस्थाही गुरूव्दारा कमिटीने केली. अस्थि घेवून नातेवाईक अमृतसरला रविवारी सकाळी निघणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोर पावनांनी आला अन् रक्कम घेवून पसार झाला, बापाच्या उपचारासाठी जुळविलेली रक्कम चोराने पळविली

Sun May 28 , 2023
– लोहमार्ग पोलिसाची सहृदयता – नागपूर रेल्वे स्थानकावरील घटना नागपूर :- स्वताच्या इच्छेला बाजुला सारून मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत घाम गाळणार्‍या बापाची शेवटची वेळ असते तेव्हा दुरवर असलेल्या संवेदनशील मुलाच्या जीवाची कालवाकालव होते. हृद्य दाटून येते आणि डोळ्यात आसवांची गर्दी होते. अशा स्थितीत पैशाची जुळवा जुळव करून तो गावी निघतो. पण नियतिच साथ देत नाही. भक्कम मेहनतीने कमविलेली संपूर्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com