चित्तरंजन नगरातील जुगार अड्यावर धाड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– पाच जुगाऱ्यावर गुन्हा दाखल,75 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल जप्त

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील चित्तरंजन दास नगर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर काल सायंकाळी सहा दरम्यान धाड घालण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून चार जुगाऱ्याना ताब्यात घेत नगदी 3590 रुपये,पेन,मोबाईल ,दरी, असा एकूण 75 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपी मध्ये मो राशीद गुलाम रसूल अन्सारी वय 30 वर्षे,रा सुफी नगर कामठी,मनीष तडसे वय 20 वर्षे रा अब्दुल्लाहशाह दरगाह,कामठी,हितेश मेश्राम वय 30 वर्षे रा न्यू खलाशी लाईन कामठी , मुकेश उर्फ अंबानी गौरखेडे वय 40 वर्षे रा रमानगर,कामठी,अब्दुल ताज अब्दुल अजीज वय 36 वर्षे रा चित्तरंजन दास नगर कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही नागपूर शहर पोलीस परिमंडळ क्र 5 चे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या नेतृत्वात सहकारी पोलीस पथकाने केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पारशीपुरा नाल्याजवळील जुगार अड्यावर धाड,आठ जुगाऱ्यावर गुन्हा दाखल,28 हजार 810 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Wed Mar 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पारशीपुरा मैदानाजवळ अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी काल रात्री 9 दरम्यान यशस्वीरीत्या धाड घातली असून या धाडीतून जुगार पत्ते, पेन, दरी,मोबाईल व नगदी 8010 रुपये असा एकूण 28 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या धाडीतून एकूण आठ जुगाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com