अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई –  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणा-या अंगणवाडी सेविकामदतनीस तसेच मुख्य सेविकापर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. या अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश  महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.

यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव  आय.ए.कुंदनएकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवालमौनी विद्यापीठाचे प्रताप देसाईमधुकर देसाईमिलिंद पांगिरेकर आदि उपस्थित होते.

            मंत्री ॲड.  ठाकूर म्हणाल्याअंगणवाडी सेविकांना कामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी  जिल्हास्तरावर वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते. राज्यात तीस अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्र व पाच मध्यम स्तर पर्यवेक्षिका केंद्र आहेत. या केंद्रामार्फत अंगणवाडी सेविकामदतनीस तसेच मुख्य सेविकापर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. कोरोना कालावधीत आपल्याला अंगणवाड्या बंद ठेवाव्या लागल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी बालकांना घरपोच आहार दिला. कोविड योध्दा म्हणून त्यांनी बजावलेली जबाबदारी  अमूल्य आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'महामत्स्य अभियाना'चा शुभारंभ मत्स्योत्पादनात महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवणार - मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

Thu May 26 , 2022
 मुंबई : महाराष्ट्राला लाभलेला ७२० कि.मी. समुद्रकिनाऱ्याचा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा कल्पकतेने उपयोग करण्याची आवश्यकता आहे.  त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नावीण्यपूर्ण उपक्रमांच्या सहाय्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांना सोबत घेऊन राज्याला मत्स्योत्पादनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करुन देण्याचा निर्धार मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज केला.             मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘महामत्स्य अभियाना‘चा आज मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते शुभारंभ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com