५ फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीतला अतिरिक्त निर्णय

– सार्वजनिक बांधकाम विभाग – सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून ६ हजार किमी रस्त्यांची कामे घेणार

मुंबई :- सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून ६ हजार किमी रस्त्यांची कामे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे रस्ते सिमेंट कॉक्रीटचे असतील आणि यासाठी २८ हजार ५०० कोटी खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.

हायब्रिड ॲन्युईटी मॉडेल हे खाजगी क्षेत्र सहभागाचे मॉडेल असून केंद्राच्या धर्तीवर मार्च २०१७ पासून हे कार्यान्वित करण्यात आले आहे. रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज अशा विविध २२ पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात प्रकल्प राबविणे तसेच निधी उभारणे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येईल. यामध्ये शासनाचा सहभाग ३० टक्के आणि एमएसआयडीसी चा उद्योजक म्हणून सहभाग ७० टक्के असेल.

या योजनेतील सर्व कामे ईपीसी तत्वावर राबविण्यात येणार असून यासाठी २.५ वर्षे बांधकाम कालावधी तर ५ वर्षे दोषदायित्व कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कामाचा प्राधान्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग निश्चित करणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकसित भारत संकल्प यात्रा (शहरी) अभियानाचा दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू

Tue Feb 6 , 2024
पुणे :- विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि शहरी विकास मंत्रालयामार्फत आजपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये या यात्रेच्या शहरी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. कोल्हापूर मधील सावित्रीबाई फुले रुग्णालय या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी यावेळी आयुष्यमान भारत कार्ड, गोल्डन कार्ड तसेच पंतप्रधान स्वनिधी योजना इत्यादी विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com