मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु

– मदतकक्षाद्वारेही करण्यात येते मदत

https://pandal.cmcchandrapur.com

येथे भेट देऊन करता येतो ऑनलाईन अर्ज  

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या एकाच ठिकाणाहुन मिळाव्या यासाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात आली असुन मनपा मुख्य इमारत येथे गणेश मंडळांसाठी मदतकक्षसुद्धा सुरु करण्यात आला आहे.

येत्या १९ सप्टेंबरपासुन ऑगस्टपासून शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी एक खिडकी प्रणाली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे.मागील वर्षी २९० गणेश मंडळांनी एक खिडकीद्वारे गणेशोत्सवाकरीता परवानगी घेतली होती

गणेश मंडळांना अर्ज करणे सोपे जावे याकरीता महानगरपालिका कार्यालयात एकल खिडकी प्रणाली मदतकक्ष सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. . https://pandal.cmcchandrapur.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो. गणेशोत्सव प्रदुषणमुक्त होण्याच्या दृष्टीने पीओपी मुर्तींना थारा न देता शाडूच्या मुर्तींचाच वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –

१. मंडळाचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र

२. ज्या जागेवर मंडप उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे ना हरकत पत्र

३. ज्या जागेवर मंडप उभारावयाचा आहे त्या जागेचा / स्टेजचा स्थळदर्शक नकाशा

४. मंडळाचे पदाधिकारी , सदस्यांची यादी व संपर्क क्रमांक.

५. मंडळाचे हमीपत्र(मंडळाच्या लेटरहेडवर)

६. संबंधित पोलीस स्टेशनचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला

७. संबंधित वाहतूक पोलिसांचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला

८. अग्निशामक विभागाचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला

९. लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मागील वर्षीचा ना हरकत दाखला

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंगळवारी ज़ोन अंतर्गत अस्वच्छता ही अस्वच्छता

Sat Aug 19 , 2023
– सो रहा है स्वास्थ्य विभाग,मजे काट रहे कर्मी  Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!