कोरड्या हवामानात तग धरू शकतील अशा 62 संवहनी (व्हॅसक्युलर) वनस्पती प्रजातींचा शोध पश्चिम घाटात करण्यात आलेल्या नव्या अभ्यासादरम्यान लागला, कोरडवाहू शेतीसाठी वापर शक्य

नवी दिल्ली :- जैवविविधतेने संपन्न असलेला पश्चिम घाट हा कोरड्या हवामानात तग धरू शकतील अशा 62 डीटी अर्थात संवहनी (व्हॅसक्युलर) वनस्पती प्रजातींचे माहेरघर आहे, ज्यांचा उपयोग कृषी क्षेत्रात विशेषतः पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये करता येऊ शकतो.

या वनस्पतींमधील पाण्याचे प्रमाण 95% कमी झाले तरीही त्या तग धरतात आणि एकदा का पाणी पुन्हा उपलब्ध झाले की त्या वनस्पती परत पहिल्यासारख्या टवटवीत होतात.

या वेगळ्या क्षमतेमुळे या वनस्पती जिथे बहुतांश इतर वनस्पती टिकू शकत नाहीत अशा तीव्र, रखरखीत वातावरणात जिवंत राहतात. पाण्याचे मर्यादित स्रोत असलेल्या ठिकाणी शेतीसाठी या डीटी वनस्पतींचा व्यावहारिक पातळीवर उपयोग, वापर कसा करता येईल याबद्दलचा अभ्यास करण्यात आला आहे. भारतात या प्रकारच्या वनस्पतींचा अभ्यास फारसा झालेला नाही.

पुणे येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या आघारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी अलीकडे केलेल्या अभ्यासात पश्चिम घाटातील या 62 प्रजाती शोधून काढल्या आहेत. आधी ज्ञात असलेल्या नऊ प्रजातींपेक्षा ही संख्या कितीतरी अधिक आहे. त्याविषयीच्या संशोधनाची माहिती नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी https://onlinelibrary.wiley.com/doi/abs/10.1111/njb.03939 या पुस्तिकेत प्रकाशित झाली आहे.

अधिक माहितीसाठी या अभ्यासातील एक सहभागी डॉ एम एन दातार यांच्याशी संपर्क साधावा (mndatar@aripune.org) 020 25325057 किंवा 9850057605

त्यातील कोरॅलोडिस्कस लॅन्युगिनोसस (Corallodiscus lanuginosus) या वनस्पतीविषयीचा व्हिडिओ http://https://youtu.be/DmCf-op_yKo या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जून 2023 पर्यंत वाढवली

Thu Jun 1 , 2023
नवी दिल्ली :- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) 2020 मध्ये राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांची (NSA) सुरुवात केली. राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 साठी 1 एप्रिल 2023 पासून अर्ज उपलब्ध असून ते सादर करण्याची अंतिम मुदत आता 15 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 अर्जाची अंतिम मुदत वाढवल्याने इच्छुक उद्योजकांना त्यांच्या नवोन्मेषी उपाययोजना आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com