३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत पाणीपट्टी कराचा भरणा केल्यास १० टक्के सुट

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील पाणी कर वसुली सुरु असून आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी थकबाकी आहे. ३१/१०/२०२२ पर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी १०% सुट देण्यात येणार आहे.

शहरातील नळधारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात असुन याअंतर्गत ३१ ऑक्टोबर पर्यंत एकमुस्ता भरणा केल्यास १० टक्के तर ०१/११/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात येणार आहे. यानंतरही भरणा न केल्यास २% अतिरिक्त दंडाची आकारणी आणि नळजोडणी बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासक यांनी पाणी कर वसुली पथकप्रमुखांना दिले आहेत.

थकीत पाणी कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे स्वीकारण्यात येत आहे.

www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर सुद्धा भरणा करता येईल. शहरातील नागरिकांनी अतिरिक्त दंड टाळण्यासाठी तसेच नळजोडणी बंद होऊ नये, यासाठी पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य शासनाच्या पत्रकारिता पुरस्काराचे लवकरच वितरण करणार - देवेंद्र फडणवीस

Sun Sep 25 , 2022
स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण  राहुल पांडे आणि महेंद्र सुके हे पुरस्काराने सन्मानित नागपूर :- आज पत्रकारिता ही कितीही संक्रमणाच्या काळातून जात असली तरीही देशात पत्रकारिता टिकली तरच लोकशाही टिकेल. तिचे मूल्य जीवंत ठेवण्याचे कार्य सुरुच ठेवूयात. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्राबाबत काळजी करण्याचे कारण नाही. राज्य शासनाकडून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार मागील तीन वर्षापासून दिले गेले नाहीत. त्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com