नाबालिक मुलीला अश्लिल शिविगाळ करून तिच्या आईचे डोके फोडले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कन्हान पोस्टे ला महिलेच्या तक्रारीने आरोपी गणेश वाढवे यास अटक व कारागृहात रवाना  

कन्हान :- महिलेच्या नाबालिक मुलीला अश्लिल शिविगाळ करून पिडीतेच्या आईला डोक्यावर काठीने मारून जख्मी केल्याने फिर्यादी महिलेच्या तक्रारीने कन्हान पोलीसानी गुन्हा दाखल करून आरोपी अटक करून न्यायालयात हजर केल्याने मा. न्यायाधिशानी आरोपी गणेश वाढवे यास कारागृहात रवानगी केली.

रामनगर पिपरी-कन्हान येथील फिर्यादी ३६ वर्षीय महिलेला तीन मुली व ती तिच्या कडील ४ एकर शेतीचे काम करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करित असते. गणेश शुक्कल वाढवे वय ३५ वर्ष हा मोहल्यात राहात असुन तो नेहमी दारू पिऊन तिला व तिच्या मुलीला शिविगाळ करित असतो. बुधवार (दि. १०) एप्रिल २०२४ ला सायकाळी ६ वाजता पतप्रधान मोदी यांच्या कन्हान येथील प्रचार सभेला ती गेली असता तीन्ही मुली घरी हजर होत्या. भाषण ऐकुण ती अंदाजे ८.३० घरी परत आली. तेव्हा तिच्या मुली जेवन करून झोपल्या होत्या. गुरूवार (दि.११) ला सकाळी १० वाजता ती शेतात जायला निघाली असता तिच्या पिडीत नाबालिक मधल्या मुलीने तिला सांगितले की, ती काल बुधवार (दि.१०) एप्रिल ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान दुकानात जात असताना मोहल्यातील गणेश वाढवे हयानी अश्लिल शिविगाळ करून तुझ्या आईला सांगशील तरी पाहुन घेईल. तेव्हा महिलेने मुलीला सोबत घेऊन त्याचे कडे गेली असता ११.१५ वाजता गणेश वाढवे चौकात दिसल्याने त्यास म्हटले की ही तुझी बहिण लागते. तु हिला अश्लिल शिविगाळ का केली ? तेव्हा त्यानी काहीही नाही बोललो म्हणुुन साफ नकार दिल्याने फिर्यादी महिलेने रागा च्या भरात त्याला दोन थापड मारल्याने त्याने शिविगाळ करून धमकी देत घरी जाऊन काडी आणुन महिलेच्या डोक्यावर मारल्याने रक्त निघु जख्मी झाल्याने ती खाली बसली. तेव्हा तो तेथुन पळुन गेल्याने महिलेनी मुलीला सोबत घेऊन कन्हान पोलीस स्टेशन गाठुन गणेश वाढवे विरूध्द तक्रार दिल्याने पोहवा. रोशन देवतळे हयानी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात आरोपी गणेश शुक्कल वाढवे वय ३५ वर्ष रा. रामनगर पिपरी-कन्हान यांचे विरूध्द पो स्ट कन्हान ला अप क्र. २७१/२०२४ कलम ३५४(अ) (१)(४), ३२४, ५०४ भादंवि व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करित कन्हान पोस्टे चे उपपोनि पराग फुलझेले व पोहवा सम्राट वनपती यानी आरोपीस अटक करून कामठी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायाधिशानी त्यास कारागृहात रवान गीचा आदेश दिल्याने आरोपी गणेश वाढवे ला नागपुर कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अधिराज गजभिये याची नवोदय विद्यालयात निवड

Sat Apr 13 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील सरस्वती कॉन्वेंट चा विद्यार्थी अधिराज राकेश गजभिये याने नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळविले.त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. अधिराजच्या या यशाबद्दल माजी नगरसेविका संध्या रायबोले व अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.त्याला मुख्याध्यापिका अनिता पैगवार, शिक्षिका मनिषा नागपुरे, कल्पना शर्मा व आईवडीलांनी मार्गदर्शन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com