मुंबई :- मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेसमध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार लेव्हल एकची आग असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेस ही १४ मजली इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जखमी झालेल्या लोकांना जवळच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त कूपर रुग्णालयाने दिले आहे.यामध्ये दोघेजण ज्येष्ठ नागरीक आहेत.