गाईच्या कोठयातुन वासराची बिबट्याने केली शिकार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– वनविभागाने बिबट्याचा ठोस उपाययोजना करून शेतक-यास नुकसाव भरपाई देण्याची मागणी केली. 

कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील येसंबा (नांदगाव) गावा लगत गाईच्या कोठयातुन पहाटे निखिल गोपाल गि-हे या शेतक-याच्या शेतातील गाईच्या कोठयातुन पाळीव गाईचा ६ माहिन्याच्या बासरास बिबट्याने शिकार करून फस्त केल्याने गावात व परिसरातील अनेक गावातील शेतकरी व गो पालक भयंकर चिंतेत आहे. येथील ग्रामस्थांमध्ये बिबट्याची चांगलीच दहश त पसरून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगलवार (दि.११) जुन च्या पहाटे ४.वाजता दरम्यान गट ग्राम पंचायत घाटरोहणा अंतर्गत येसंबा गावालगत असलेल्या शेतकरी निखिल गेपालजी गि-हे याचा शेतातील गाईच्या कोठयातुन ६ महिन्याच्या गाई च्या वासरा ला बिबट्यानी शिकार करून फस्त केले. घटनास्थळी वनक्षेत्र सहायक अधिकारी अशोक दिग्रेसे यांचे प्रमुख उपस्थितीत वनरक्षक सतिश वासनिक, वन मजुर मैसुर भोंडेकर यांनी घटनास्थळी पोहचुन मृत पाळीव गाईचा वासराचा पंचनामा केला. याप्रसंगी पिढीत शेतकरी निखिल गोपाल गिहे सह गावातील शेतकरी नागरिकानी गौ पालक शेतक-यास नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मांगणी करून वनविभागा व्दारे ठोस उपाययोजना करावी. अशी मागणी ग्रामस्थ शेतक-यांनी शासनास केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एसटी बस कंडक्टर ने नाबालिग मुलींची केली छेडछाड

Wed Jun 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- महामंडळ एसटी बस कंडक्टर ने नाबालिक मुलींची छेडछाड करून बस कांद्रीत न थाबता तारसा रोड चौकात थाबवल्यावर त्या मुलीच्या आत्यानी जाब विचारला असता त्यांचा सुध्दा विडिओ काढुन त्या बस मध्ये चढल्या असता त्यांचा हात ओढल्याने सदर प्रकरणी कन्हान पोलीसानी घटस्थळी पोहचुन बस व कंडक्टर ला ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील कारवा़ई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com