नशा करण्यासाठी महिलांना जाळ्यात ओढणारा जेरबंद

– चोरीचे मोबाईल विकायचा,पोलिस तपासात खुलासा

नागपूर :– अंमली पदार्थाच्या आहारी गेलेला 23 वर्षीय तरुण एकट्या महिलांना हेरून त्यांना जाळ्यात ओढायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळून नशा करायचा. एवढेच नाही तर मोबाईलची चोरी करून ते देखील विकायचा. या पैशातून हा तरुण गांजा आणि नशेच्या गोळ्या घेत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीचा महागडा मोबाईल जप्त केला आहे.

विकास ऊर्फ रॉनी (23, जलगनगर, चंद्रपूर) असे त्याचे नाव आहे. तो बारावी पास आहे. त्याला आई-वडील, एक भाऊ आहे. वाईट संगतीमुळे तो अंमली पदार्थाच्या आहारी गेला. व्यसन पूर्ण करण्यासाठी तो रेल्वेत चोरी करतो. चार्जिंगवरील मोबाईल किंवा बर्थवर ठेवलेले मोबाईल नजर चुकवून चोरी करतो आणि त्याची विक्री करतो. त्या पैशावर व्यसन पूर्ण करतो.

शुक्रवार, 28 जुलै रोजी त्याने केरळ एक्सप्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल चोरला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक त्याच्यापर्यंत पोहोचले. सखोल चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या जवळून चोरी केलेला मोबाईल, काही गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राचलवार, पोलिस हवालदार महेंद्र मानकर, नामदेव शहारे यांनी ही कारवाई केली.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शस्त्र घेऊन न्यायालयाच्या आवारात शिरलेला अटकेत

Sun Jul 30 , 2023
नागपूर :-जिल्हा न्यायालय आवारात एका युवकाजवळ शस्त्र मिळून आले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत एक चाकू हाती लागला. या तरुणाला सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. स्वप्नील गजभिये (28, खापरखेडा) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. स्वप्नील हा शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालय परिसरात शिरला. चौकीतील पोलिसांनी बॅगची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक चाकू मिळून आला. जिल्हा न्यायालय परिसरात येण्याचे कारण विचारले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com