संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-सुदैवाने जीवितहानी टळली
कामठी ता प्र 28 :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ येथे कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असता अचानक घराला आग लागल्याची घटना सकाळी 7 दरम्यान घडली असून ही आग तिरंगा चौक रामगढ येथील निखिला बैरागी बेसरा यांच्या घराला लागली दरम्यान सुदैवाने जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच लोकसेवक उज्वल रायबोले यांनी त्वरित घटनास्थळ गाठून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याशी संबंध गाठून आगजन्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश गाठले.